बॉलिवूडचा भाईजान म्हणून सलमान खानला ( Salman Khan) ओळखले जाते. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी हवा तितका प्रतिसाद दिला नाही. दरम्यान मध्यंतरी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई ( Lorence Bishnoi) कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे. या धमकीमुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
असे असतानाच दुबई येथे झालेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानने मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी तो म्हणाला आहे की, मला कितीही धमक्या मिळाल्या तरीही मला यूएईमध्ये ( UAE) सुरक्षित वाटते. मात्र भारतामध्ये थोडी समस्या आहे. सलमान खानच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. ( Salman khan disappointed about indian security)
काळवीट शिकार प्रकरणात अडकल्यापासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई कडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अनेकदा लॉरेन्स बिश्नोईने स्वतः यावर उघड उघड वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानला मुंबई पोलिसांकडून संरक्षण आहेच. मात्र सलमानची स्वतःची खासगी सुरक्षा देखील आहे. मागील वर्षी सलमान खानने स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना घेतला आहे.
Health Updates | जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर