अॅमेझॉन ही प्रसिद्ध ऑनलाइन सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी लोक प्राईम मेंबरशिप किंवा सबस्क्रिप्शन घेतात. अॅमेझॉनने नुकतीच आपल्या ग्राहकांना धक्का बसणारी एक नवीन माहिती दिली आहे. अॅमेझॉनच्या प्राईम मेंबरशिपच्या किंमतीत वाढ झाली असून त्यासाठी लोकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. ( Amazon Prime Membership)
मध्यंतरी Amazon ने आपल्या प्राइम मेंबरशिपसाठी काही सवलत दिली होती. मात्र, आता त्यांनी आपल्या प्राइम मेंबरशिपची किंमत बदलली आहे. इथून पुढे भारतात Amazon प्राइम मेंबरशिपची किंमत एका महिन्यासाठी २९९ रुपयांपासून सुरु झाली आहे. याआधी ती १७९ रुपये होती. अॅमेझॉनच्या जुन्या दरांचा विचार करता आता नवीन दरात झालेली वाढ मोठी आहे. ती तब्बल १२० रुपयांनी वाढली आहे.
यापुढे तुम्हाला Amazon प्राइम मेंबरशिपच्या तीन महिन्यांच्या प्लानसाठी ५९९ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा प्लॅन ४५९ रुपयांना होता. यामध्ये १४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यातल्या त्यात एक चांगली बातमी म्हणजे वर्षभराच्या प्राईम मेंबरशिप प्लानच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वार्षिक Amazon प्राइम मेंबरशिपची किंमत १४९९ रुपये आहे.
Health Updates | जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर