दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. चहाच्या दुधापासून ते गाडीच्या इंधनापर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र अशातच लोकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे मागील महिन्यात गॅस सिलिंडरचे ( LPG) दर होते तेच या महिन्यात राहणार आहेत.
Amol Kolhe । मोठी बातमी! खासदार अमोल कोल्हे जखमी
मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर बदलले होते. त्यानंतर एप्रिल मध्ये दरात कोणताही बदल करण्यात आला न्हवता आणि आता मे महिन्यात सुद्धा घरगुती गॅस सिलिंडरचा दर ‘जैसे थें’ असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (LPG rates in May)
Viral Video । अन् बायकोने नवऱ्याला मारायला सुरुवात केली; भर रस्त्यात झाला तमशा!
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती
१) दिल्ली – ११०३ रुपये
२) कोलकत्ता – ११२९ रुपये
३) मुंबई – ११०२.५० रुपये
४) चेन्नई – १११८.५० रुपये
Amazon Prime | अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपच्या किंमतीत वाढ; ग्राहकांना मोठा धक्का
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती
१)दिल्ली – १८५६.५० रुपये
२)कोलकत्ता – १९६०.५० रुपये
३)मुंबई – १८०८.५० रुपये
४)चेन्नई – २०२१.५० रुपये
Salman Khan । सलमान खानला भारतात सुरक्षित वाटत नाही; एका मुलाखतीत केला खळबळजनक दावा…