
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. (Retirement) यापार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या सर्वांच्यात शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधक ठरली आहे.
अजित पवारांचा संजय राऊतांवर इफेक्ट! म्हणाले, ” मी राष्ट्रवादीत कुठलाच हस्तक्षेप करणार नाही…”
याबाबत बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, ‘शरद पवारांनी पदाचा राजीनामा दिलाय याचं मला अतिशय दु:ख वाटत आहे. त्यांनी राजीनामा परत घ्यावा. पवारांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, त्यामुळे त्यांनी लोकांच्या भावना ओळखाव्यात आणि आपला राजीनामा परत घ्यावा,’ असं त्या म्हणाल्या आहेत.
Sharad Pawar | शरद पवार फेरविचार करणार! अजित पवारांकडे दिला ‘हा’ निरोप
दरम्यान, शरद पवारांनी अजित पवारांकडे कार्यकर्ते व नेत्यांसाठी निरोप दिला आहे. तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस वेळ द्या. असं शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असं सुद्धा शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Whatsapp New Feature । व्हॉट्सअॅप मध्ये नवीन फिचर आले रे…, जाणून घ्या सविस्तर