राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
मध्यंतरी ‘भाकरी फिरवायची वेळ आली आहे’ असं म्हणत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र नेतृत्व बदलण्यासाठी शरद पवार स्वतःच निवृत्ती घेतील, असे कोणालाच वाटले न्हवते. दरम्यान शरद पवारांनी हा निर्णय ‘का’ घेतला असेल ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातली काही महत्त्वाची कारणे जाणून घेऊयात…( Reasons behind sharad pawar’s retirement descision)
मुलं मोठी झाली की त्यांच्यासोबत झोपू नये; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण…
१) अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार या चर्चा काही केल्या थांबत नाहियेत. या चर्चा थांबवण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी खेळली असावी. या निर्णयामुळे अजित पवारांचे पक्षातील महत्त्व कमी होऊन ते अडचणीत येतील. कार्यकर्ते भावनिक होऊन अजित पवारांना पाठिंबा देणार नाहीत. यामुळे अजित पवार बंडखोरी करणार नाहीत.
Sharad Pawar । शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण असणार? ‘ही’ चार नावे आली समोर
२) ‘आपल्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष फुटला’ असा कलंक माथी लावून घ्यायला नको म्हणून पवारांनी हे पाऊल उचलले असू शकते. कदाचित उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तर मी पक्षात सक्रीय नाही, मी अध्यक्ष नाही, मी असतो तर असं झालं नसतं, अशी तटस्थ भूमिका शरद पवारांना मांडता येऊ शकेल.
३) अगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार टीकेच्या वर्तुळाबाहेर असतील. शरद पवारांवर टीका केली तर ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची टीका नसणार आहे.
४) भावनिक खेळी खेळून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात आपल्या मनाप्रमाणे पक्षवाटणी करता यावी. यासाठी सुद्धा शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो.
Uorfi Javed | उर्फी जावेदचा नवीन कारनामा पाहून डोकं चक्रावेल; पाहा Video