Eknath Shinde: मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याची नोकरीसंदर्भात महत्वाची घोषणा; म्हणाले…

Chief Minister's important announcement regarding Maratha reservation meeting; said…

मुंबई : काल संध्याकाळी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत(Maratha reservation) महत्त्वाची बैठक (meeting)पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी या बैठकीमध्ये नोकरीसंदर्भात एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे.

Eknath Shinde: “हो.. मी कंत्राटीच मुख्यमंत्री, पण…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंच जशाच तस उत्तर

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या वेगेवेगळ्या पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या तब्ब्ल १ हजार ६४ उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार”.

Ramdas Athawale: ‘या’ महिन्यात होणार महापालिका निवडणुका, आठवलेंनी सांगितली महत्वाची माहिती

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, जवळपास २ हजार १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. त्यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर बाकी १ हजार ०६४ उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांमध्ये लवकरात लवकर रुजू करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल. उरलेल्या ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *