राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे एकीकडे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( NCP) वातावरण तापले आहे. याठिकाणी पक्षातील काही नेते नाराज आहेत. तसेच शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आह. ( Sharad pawar’s trending statement)
चोर तो चोर वरून शिरजोर! वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून चालकाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी शरद पवारांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आहे. मी पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला होता. पक्षात नवीन नेतृत्व तयार व्हावे, हा यामागचा हेतू होता. असे निर्णय घेताना सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावे लागते. परंतु, मी तुमच्यासोबत चर्चा केली असती तर तुम्ही कधीच ‘हो’ म्हणाला नसता.
“…अन् आई वडीलांसमोर लहान मुलाने सोडला जीव”, वादळीवाऱ्यात लेकराने गमावला जीव
या निर्णयाबाबतचा अंतिम निर्णय येत्या एक ते दोन दिवसांत करण्याची आम्ही भूमिका घेऊ. पण ही भूमिका घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. दोन दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही. असे मी तुम्हाला आश्वासन देतो. असे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या या विधानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
‘या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीसाठी लाखोंचे अनुदान; यादी झाली जाहीर