कुकडी साखर कारखान्यास (Kukdi Sugar Factory) शेतकऱ्यांनी ऊस घालून 3 महिने पेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी कारखान्याकडून शेतकऱ्यानं अद्याप देखील उसाची बिले भेटलेली नाहीत. कारखान्याच्या एम.डी श्री.मरकड साहेब यांची भेट घेऊन यांना वेळोवेळी शेतकऱ्यांना बिले अदा करण्यास सांगितले असताना त्यांच्याकडून फक्त पोकळ आश्वासने देण्यात आली पण शेतकऱ्यांना अजूनही काही बिले भेटली नाहीत. शेतकरी आपली उसाची बिले मागण्यासाठी कारखान्यावर गेले असताना बऱ्याच वेळा तिथं एम.डी साहेब हजर नसत. त्यांना संपर्क केला असताना ते शेतकऱ्यांचे कॉल देखील रिसिव्ह करत नव्हते.
चोर तो चोर वरून शिरजोर! वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून चालकाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी
पावसाळा तोंडावर आला असताना अजूनही शेतकऱ्यांना मशागती साठी पैसे नाहीत तसेच कारखान्याकडून मार्च ला बिले न आल्यामुळे बरेच कर्जदार शेतकरी सोसायटी थकबाकीत गेले ते फक्त आणि फक्त कुकडी कारखाण्याच्या गलथान कारभारामुळे.
“…अन् आई वडीलांसमोर लहान मुलाने सोडला जीव”, वादळीवाऱ्यात लेकराने गमावला जीव
आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने कारखान्याचे एम.डी यांच्या खुर्चीला पुष्पहार घालण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी गेले असताना त्यांना केबिन बाहेरच अडविण्यात आले तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी केबीनलाच पुष्पहार घालून कारखान्याच्या गलथान कारभाराचा निषेध केला. तसेच कारखान्याकडून शेतकऱ्यांची बिले कधी मिळणार यासाठी लेखी आश्वासन मागितले असता कोणी प्रशासकीय कर्मचारी पुढे आले नाही. येत्या 4-5 दिवसात शेतकऱ्यांची बिले जमा न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कारखाना प्रशासनास देण्यात आलेला आहे
‘या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीसाठी लाखोंचे अनुदान; यादी झाली जाहीर
यावेळी संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा तालुका अध्यक्ष श्री.नानासाहेब शिंदे यांच्यासह विविध भागातून आलेले ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
Gautami Patil । गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलाचे वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का!
संग्राम देशमुख
(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी)