Devendra Fadanvis । सलमान खानने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे काढले वाभाडे मग देवेंद्र फडणवीस यांनी दिले सडेतोड उत्तर!

Devendra Fadanvis. Salman Khan criticized India's security system, then Devendra Fadnavis gave a bitter reply!

सलमान खानचा किसीं का भाई किसीं की जान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची हवी तितकी कमाई झालेली नाही. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई कडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान ( Salman Khan) सध्या चर्चेत आहे. काळवीट शिकार प्रकरणानंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई ( Lorence Bishnoi) कडून सलमानला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आता सलमान खानला Y+ सुरक्षा पुरवली आहे.

त्यावेळी चुकून प्रसिद्ध अभिनेत्री रेड लाईट एरियात गेली अन् तिथल्या लोकांनी… पुढची गोष्ट वाचून तुम्हालाही बसेल धक्का

या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ” सलमान खानला सध्या देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्यामुळे त्याला मुंबई किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटते सलमान खानसाठी देशात मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही. ” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Gautami Patil । ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारा अल्पवयीन मुलगा सापडताच गौतमीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “आता खूप…”

त्याच झालं असं होतं की, काही दिवसांपूर्वी सलमान खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी रजत शर्मांच्या मुलाखतीत सामील झाला होता. यावेळी त्याने लॉरेन्स बिश्नोई कडून येणाऱ्या धमकीवर खुलेपणाने भाष्य केले होते. “मला सतत धमक्या मिळत असल्या तरी यूएईमध्ये सुरक्षित वाटते. मात्र भारतामध्ये थोडी समस्या आहे.” असे म्हणत सलमान खानने भातातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

शेतकऱ्यांची बिले वेळेत न दे देणाऱ्या कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या एम.डी च्या दालनाला पुष्पहार घालून संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *