‘द केरळ स्टोरी’ ( The Kerla Story) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा ट्रेलर ( Trailor) रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. समाजातील अनेक घटकांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. यासाठी अनेकांनी कोर्टात देखील धाव घेतली होती. मात्र अनेक वादांना तोंड देत काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. ( The kerla story movie stucked in crisis)
Uddhav Thackeray । राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल – उद्धव ठाकरे
महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट रिलीज होताच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. येत्या विकेंडला हा चित्रपट अजून ‘धुरळा’ करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर केरळ उच्चन्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. केरळ उच्चन्यायालयाने ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आहे.
Virat Kohali । विराट कोहलीची त्याच्या जवळच्याच मित्राने केली पोलखोल; म्हणाला…
परंतु, न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना काही सूचना दिल्या आहेत. 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. चित्रपट निर्मात्यांनी यासाठी सहमती दाखवली असून ही माहिती सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे.
महिलेसोबत विमानात घडला धक्कादायक प्रकार; ऐकून तुम्हालाही धक्का बसेल