दिल्ली : अमेरिकेत (America)वंश भेदावरून नेहमी वेगवेगळ्या घटना घडत असतात. अशातच अमेरिकेत मेक्सिकन-अमेरिकन वंशाच्या महिलेने भारतीय(Indian)वंशाच्या 4 महिलांवर वर्णभेदावरून(apartheid) हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमेरिकन महिलेने बंदुकीतून गोळ्या घालण्याची धमकीही या भारतीय महिलांना दिली. या आरोपी महीलेच नाव एस्मेराल्डा अप्टन असे आहे. तसेच ती टेक्सासमधील प्लानो येथील रहिवासी आहे. हल्ला करताना ही महिला वारंवार ‘मला भारतीयांचा तिरस्कार आहे’ (I hate Indians)अस म्हणायची.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, टेक्सासमधील प्लानो शहरातील पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत एस्मेराल्डा ऑप्टन या महिलेला अटक केली. आरोपी महिलेला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला असून तिच्यावर वर्णभेदावरून केलेल्या कृत्याप्रकरणी धमकी देण्याबाबत कलम लावण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
This is so scary. She actually had a gun and wanted to shoot because these Indian American women had accents while speaking English.
— Reema Rasool (@reemarasool) August 25, 2022
Disgusting. This awful woman needs to be prosecuted for a hate crime. pic.twitter.com/SNewEXRt3z
नेमकी घटना काय घडली?
चार भारतीय वंशाच्या महिला टेक्सासमधील डॅलस येथील हॉटेलमध्ये जेवण करून पार्किंगच्या दिशेने चालल्या होत्या.दरम्यान अचानक एक मेक्सिकन-अमेरिकन वंशाची महिला तिथे आली. त्या महिलेने भारतीय महिलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. हल्ला करताना ती वारंवार म्हणत होती की, ‘मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. असे म्हणत भारतीय वंशाच्या महिलांवर ती महिला अटॅक करत राहिली.आरोपी महिलेने सांगितले की, तिचा जन्म अमेरिकेत झाला, पण ती जिथे जाते तिथे तिला भारतीयच दिसतात. जर भारतात जीवन चांगले आहे तर तुम्ही लोक इथे का आलात? असा प्रश्न करत तिने त्या महिलांवर राग व्यक्त केला.
Eknath Shinde: मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याची नोकरीसंदर्भात महत्वाची घोषणा; म्हणाले…
एका व्यक्तीने या घटनेबाबत लिहिले की….
एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘माझी आई आणि तिच्या 3 मैत्रिणी डॅलसमध्ये जेवायला गेले होते. ते पार्किंगमध्ये परतत होते तेव्हा एक मेक्सिकन-अमेरिकन महिला तिथे आली. चौघांवर वर्णभेदावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा आईने त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिलेला राग आला आणि तिने आई आणि तिच्या मैत्रिनींना मारहाण करण्यास सुरुवात केली.
Eknath Shinde: “हो.. मी कंत्राटीच मुख्यमंत्री, पण…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंच जशाच तस उत्तर