
कॉल वरून एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘सिम कार्ड’ ( Simcard) आवश्यक असते. सिमकार्ड असल्याशिवाय मोबाईल मध्ये नेटवर्क सेवा वापरता येत नाही. दरम्यान आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळे सिमकार्ड वापरून वेगवेगळे नंबर घेतो. एक व्यक्ती आपल्या नावावर एकापेक्षा जास्त सिमकार्ड घेऊ शकतो. दरम्यान या संदर्भात एक नवीन अपडेट ( New Update) समोर आली आहे. सरकारने एक वेबसाईट सुरू केली आहे, ज्यामध्ये एखाद्या सिमकार्ड वापरकर्त्याच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत. याची माहिती घेता येते.
Baramati | मोठी बातमी! अजित पवारांच्या बारामतीतील घराशेजारी तरुणीचा विनयभंग; दादा भडकले, म्हणाले…
महत्त्वाची बाब म्हणजे ही माहिती घेताना असे दिसून आले की, तुमच्या नावावर असा एखादा नंबर दिसतोय जो याआधी तुम्ही कधीही घेतला नसेल, तो तुम्ही एका क्लिकवर ब्लॉक (Block on one click) करू शकता. सध्या तुमच्या नावावर किती सिम सक्रिय आहेत ? हे जाणून घेण्यासाठी www.tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाइटवर जा.
LIC ची सरल पेन्शन योजना! वर्षाला मिळणार एक लाखांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या सविस्तर..
याशिवाय सिम कार्ड वापरण्याच्या संख्येबाबत सुद्धा एक नवीन बदल करण्यात आला आहे. दूरसंचार कंपन्या लवकरच सिमची संख्या कमी करण्याबाबत आणि केवायसीमध्ये वैयक्तिक पडताळणी करण्याबाबत सूचना जाहीर करणार आहेत. फसवणूक आणि सायबर फसवणुकींच्या वाढत्या प्रकरणांमुळे सिमकार्डच्या भूमिकेबाबत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.