
भारतात सध्या आयपीएलचे ( IPL) वारे सुरू आहे. हे सामने संपताच भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तयारीला लागेल. दरम्यान सध्या ‘एशिया कप 2023’ ( Asia Cup 2023) ची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. येत्या सप्टेंबर मध्ये पाकिस्तान मध्ये याचे सामने होऊ शकतात. मात्र या स्पर्धेबाबत बीसीसीआयने (BCCI) अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाऊन सामना खेळणार नाही. असे मत बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.
‘एशिया कप 2023’ ( Asia cup 2023) साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डासमोर समोर एक प्रस्ताव ठेवला आहे. हायब्रिड मॉडेलचा हा प्रस्ताव आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाला हा प्रस्ताव मान्य नसून त्यांनी तो धुडकावून लावला आहे. बीसीसीआयच्या या नकारात्मक भूमिकेला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांनी हमी भरली आहे.
Sharad Pawar | ठाकरे गटाकडून शरद पवारांवर गंभीर आरोप! अजित पवारांना सुद्धा फटकारले
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या ( BCCI) या भूमिकेमुळे पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा रद्द झाली तर बांगलादेश व श्रीलंकेत या स्पर्धेचे सामने होऊ शकतात. दुसरी बाब म्हणजे भारताने हायब्रीड मॉडेलचा ( Hybrid Model) प्रस्ताव स्वीकारला नाही तर, पाकिस्तान संघाला एशिया कप स्पर्धेत खेळता येणार नाही. अशी माहिती पीसीबी अध्यक्ष ( PCB President) नजम सेठी यांनी दिली आहे.
हृदय भला तो सब भला! म्हणून निरोगी हृदयासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…