मुंबई : काँग्रेस (congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी सोनिया गांधींना (Soniya Gandhi) चार पानांचं पत्र पाठवत पक्षातील सर्व पदांचा राजीनामा (resignation) दिला आहे.तसेच पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे.पक्षाने जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला होता. गुलाम नबी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात होतं.गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील रंगली होती.
Ranbir Kapoor: दाक्षिणात्य पद्धतीने जेवण केल्यामुळे रणबीर कपूरवर नेटकरी संतापले; पहा VIDEO
गुलाम नबी पत्रात काय म्हणाले
गुलाम नबी आझाद यांनी पत्रात नमूद केले आहे की , पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले.तसेच जेव्हा राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप केला आहे.
Virat kohali: विराट कोहली धोनीच्या आठवणीत झाला भावूक, फोटो शेअर करत म्हणाला…
पुढे गुलाम आझाद म्हणाले की, राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होता. आणि हाच बालिशपणा २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता असा दावा त्यांनी केला आहे.