गुवाहाटीमध्ये ( Guwahati) एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका डॉक्टर दाम्पत्याने लैंगिक शोषण ( Sexual harrashment) करून दोन मुलांचा छळ केला आहे. या प्रकरणी डॉक्टर दाम्पत्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी या डॉक्टर दाम्पत्याच्या ( Doctor couple) घरातून तीन मुलांची सुटका केली आहे. यामध्ये एक मुलगी व दोन मुलांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गतही कारवाई केली आहे.
“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
पोलिसांच्या सांगण्यानुसार गुवाहाटी मधील एका प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याने तीन मुले दत्तक घेतली होती. या तिन्ही मुलांचे शारीरिक शोषण करण्यात आले असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी मानसोपचारतज्ज्ञ संगीता दत्ता व त्यांचे पती यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी चार वर्षांच्या एका मुलीला खांबाला बांधून गच्चीवर ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली, यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान डॉक्टर दाम्पत्याने ही तिन्ही मुले कायदेशीररित्या दत्तक घेतली होती की नाही याबद्दल अजून साशंकता आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी दत्ता दाम्पत्याच्या घरी असणाऱ्या मोलकरणीला सुद्धा अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी संगीता दत्ता या प्रसिद्ध मनोसपचारतज्ज्ञ असून त्या अनेक टीव्ही चॅनलच्या टॉक शो मध्ये दिसल्या आहेत.