मागील कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court result) दिला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामधील पहिली तीन निरीक्षणे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या बाजूने दिली आहेत. यामध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा व्हीपचा निर्णय, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा निर्णय आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देईल. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil Parab) यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २०१६ मधीक नबाम रेबिया प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांसंबंधित निकाल आता मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.
ब्रेकिंग! उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर घड्याळाचे काटे फिरवले असते – सुप्रीम कोर्ट
सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांच्यासमोर १६ आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय जाईल, त्यावेळी सुनील प्रभु हेच व्हीप असणार आहेत. यावेळी सुनील प्रभू यांनी दिलेले आदेश त्यांना पाळावे लागतील. त्यामुळे ते १६ आमदार अपात्र होणार आहेत. अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. दरम्यान आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ