मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे व ठाकरे गटाकडून सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या ४ याचिकांवर आज निकाल दिला आहे. यामध्ये सत्तासंघर्षाच्या काळातील राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मांडले तसेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
या सर्वांनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड झाली आहे. गद्दारांचा अविश्वास प्रस्ताव स्वीकारायची इच्छा राहीली नव्हती, म्हणून मी राजीनामा दिला. मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझा लढा जनतेसाठी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरेंना ती चूक भोवली…” पाहा नेमकं काय म्हंटल आहे सुप्रीम कोर्टाने
दरम्यान १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे हा निर्णय कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.