महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देश डोळे लावून बसला होता. आज यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. दरम्यान आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ( MLA disqualification descision) मात्र झालेला नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला गेला आहे. म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देतील.
मात्र, राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतल्यानंतर याप्रकरणी कार्यवाही करणार आहेत. दरम्यान, नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, आमदारांच्या पात्रतेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असतो. हे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेतली जाईल व लवकरच योग्य तो निर्णय दिला जाईल.
Rohit Sharma | मोठी बातमी! रोहित शर्मा डिप्रेशनमध्ये, ‘या’ खेळाडूने केला मोठा खुलासा
परंतु त्याआधी इतर कार्यवाही सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे. सर्वात आधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व नेमके कोण करते ? याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. कोर्टाने सुद्धा तसेच सांगितले आहे. त्यामुळे आम्ही सर्वात आधी यावर निर्णय घेऊ. यावेळी सर्व आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला जाईल. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय लवकरच घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल. निर्णय द्यायला नेमका किती वेळ लागेल, हे मात्र सांगता येत नाही.
Big Breaking | शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका! प्रश्न पुन्हा उपस्थित