गौतमी पाटील ( Gautami Patil) हे नाव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. राज्यातील गावागावांत तिचे चाहते आहेत. एकीकडे गौतमीवर प्रचंड टीका केली जाते तर दुसरीकडे जत्रांमध्ये, समारंभांमध्ये गौतमीच्या कार्यक्रमांचीच चलती आहे. गौतमीच्या कार्यक्रमात लोकांना उभं राहायलाही जागा नसते एवढी गर्दी असते. लोक घराच्या छतावर उभं राहून, झाडावर बसून, दुकानावर बसून गौतमीचे कार्यक्रम बघतात. एवढा मोठा गौतमीचा फॅन बेस आहे. ( Fan base of Gautami Patil)
Jio Plan | डेली ३ GB डेटा आणि डेटा ऍड ऑन चे मोफत व्हाऊचर! जिओचा हा जबरदस्त प्लॅन एकदा ट्राय कराच…
दरम्यान गौतमीच्या एका चाहत्याने आपल्या एका कृतीने हद्दच पार केली आहे. गौतमीच्या अदांनी सांगली मधला एक एसटी चालक चांगलाच भुलला असून या चालकाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. या एसटी चालकाने बसस्थानकात केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
“माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाने मला…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
‘गावात गौतमी पाटील येणार आहे त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी द्या.’ असं लिहून एसटी चालकाने डेपो मॅनेजरला अर्ज केला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव डेपोमधील हा एसटी चालक आहे. परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावे अर्ज व्हायरल होत आहे. त्या चालकाने असा कुठलाच अर्ज केलेला नाही असे उघड झाले आहे. तसेच असा कोणताही अर्ज तासगाव एसटी आगारात सुद्धा आलेला नाही. यामुळे कुणीतरी सोशल मीडियावर चर्चा घडवण्यासाठी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट होत आहे.