शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजकीय खेळी कायमच लोकांचा चर्चेचा विषय होतात. त्यातल्या ‘२०१९ चा पहाटेच्या शपथविधी’ वर तर सतत वेगवेगळे दावे केले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या शपथविधी संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mumgantiwar ) यांनी खळबळजनक दावा केला आहे. “हा शपथविधी ठाकरे गटाला ( Thackeray Group) धडा शिकवण्यासाठी होता.” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
Sex Racket | धक्कादायक! पुण्यात सेक्स रॅकेट उघड, यामध्ये अडकली अभिनेत्री अन् मॉडेल…
” २०१९ मधील पोटनिवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली. परंतु ठाकरे गटाने आमच्यासोबत विश्वासघात केला. म्हणून हे एक राजकीय ऑपरेशन होते. हा एक मोठा गनिमी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.” असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
Tema India | टीम इंडियातील ‘या’ दोन खेळाडूंचे फोटो पाहून चाहते ढसाढसा रडू लागले; पाहा Photo
त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हाला देखील उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. कारण, उद्धव ठाकरेंनी त्यावेळी शिवसैनिकांचा अवमान केला होता. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. ते शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राजकीय घडामोडींचा वेग! शरद पवारांच्या घरी आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक