उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडून पिकाची नुकसान होणे, कडक उन्हामुळे पिके करपणे, या सर्व गोष्टीमुळे शेतकरी हा निसर्गावर नाराज झालेला दिसून येतो. या गोष्टीवर तोडगा म्हणून राज्य सरकारकडून कृषी योजना राबवल्या जाणार आहेत. बिहार सरकारने फळ लागवडीला चालना मिळावी म्हणून एक योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा फळबाग शेतकऱ्यांना होणार आहे.
Jayant Patil । ब्रेकिंग! जयंत पाटील यांना पुन्हा ‘ईडी’ची नोटीस
फळ लागवडीमध्ये एकदा रोपे लावल्यानंतर त्यामध्ये जास्त कष्ट नसते त्यामुळे शेतकरी फळबागा लागवड करताना दिसून येतात. शेतकऱ्यांना फळबाग उत्पादनातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते परंतु लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. त्यामुळे शेतकरी फळबागेचे पीक घेत नाही. म्हणून हा विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली आहे.
बिहार सरकारने शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Adah Sharma । सर्वात मोठी बातमी! केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात