लग्न ( marriage) हा एखाद्याच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा प्रसंग असतो. यावेळी भावी आयुष्यासाठी प्रचंड स्वप्ने रंगवली जातात. मात्र सध्या बिहारमध्ये (Bihar) लग्नावेळी एक धक्कदायक घटना घडली आहे. बिहारमधील आराह जिल्ह्यातील भोजपूर येथे एका लग्नाच्या मिरवणुकीत अप्रिय घटना घडली आहे. यामध्ये नवरदेव लग्न मंडपाऐवजी थेट रुग्णालयात जाऊन पोहोचला आहे.
Ac Bedsheet | उन्हाळ्यात घ्या एसी बेडशीटचा फील! थंडा.. थंडा ..कूल… कुल
नेमकी काय घडली घटना?
बिहारमध्ये वऱ्हाडाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही मुली देखील नाचत होत्या, त्याचवेळी गावातील काही बदमाश तरुणांनी मिरवणुकीत मुलींची छेडछाड करायला सुरवात केली. यावेळी यामधील काही लोकांनी त्यांना विरोध करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र बदमाशांनी ते मान्य केले नाही आणि वराला रथातून उतरवून बेदम मारहाण केली, त्यामुळे नवरदेव बेशुद्ध झाला आणि त्याला थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
CKS vs KKR । मोठी बातमी! धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कालच्या मॅच नंतर मैदानावर असं काय घडलं?
अमन कुमार पासवान असं या नवरदेवाचा नाव आहे. लग्नामध्ये काही बदमाश मुलीसोबत छेडछाड करत होते यावेळी अमनने त्यांना विरोध केला मात्र बदमाशांनी वराला रथातून उतरवून हाणामारी सुरू केली आणि वर बेशुद्ध झाला. या घटनेनंतर त्या बदमाशांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
सर्वात मोठी बातमी! गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलिसात तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण?