आपण सर्वांनी आत्तापर्यंत लाल टोमॅटो हे पाहिले आहे. परंतु आता बाजारामध्ये टोमॅटोच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या आहेत. यामध्येच काळा टोमॅटो( Black tomato) जो दिसतायला देखील सुंदर व खायला देखील चविष्ट आहे. तसेच या काळ्या टोमॅटोमध्ये विटामिन सी हे जास्त प्रमाणात आहे. व हे काळे टोमॅटो शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यास देखील मदत करतात.
ब्रेकिंग! समीर वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे मागितले २५ कोटी? समोर आली धक्कादायक माहिती
देशातच नव्हे तर परदेशात देखील या काळात टोमॅटोची मागणी (demand for tomatoes) वाढत आहे. या टोमॅटोचे उत्पन्न कोणत्याही शेतात निघते. व त्याची लागवड ही जशी लाल टोमॅटोची केली जाते त्याचप्रकारे केली जाते. या टोमॅटोची वाढ ही थंड ठिकाणी चांगली होते. या टोमॅटोची लागवड जानेवारीमध्ये केल्यास मार्च व एप्रिलमध्ये त्याचे उत्पन्न मिळते.
चीनच्या नाकावर टिच्चून Tata Group लॉन्च करणार iPhone 15
या टोमॅटोचे सेवन केल्याने आजारापासून मुक्ती मिळते. व हा टोमॅटो काढल्यानंतर शेतकरी हा जास्त दिवस ताजा ठेवू शकतो. तसेच टोमॅटोची चव थोडीशी खारट आहे. या टोमॅटोमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो. या टोमॅटोची मागणी पाहून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील शेतकऱ्यांनी काळ्या टोमॅटोची लागवड केली आहे. तसेच हे काळे टोमॅटो बी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध देखील होतात.
Urfi Javed । उर्फी जावेदने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला…”