शेतकरी सर्वात जास्त वाट बघतो ती म्हणजे पावसाची. परंतु पाऊस काही गेल्या महिन्यामध्ये कधीही कोसळत असल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत होता. काही शेतकऱ्यांची पिके पाण्याने सडली तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येते. नुकसानीनंतर सरकारने शेतकऱ्यांना भरपाईची आश्वासने दिली होती मात्र नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना यंदाचा मान्सून हा फायद्याचा असणार की तोट्याचा यावर लक्ष वेधलं आहे. यावर हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाचा मान्सून हा वेळेवर हजर असणार आहे असे सांगितले आहे.
प्रसिद्ध क्रिकेटपटूचं शार्दुलबद्दल संतापजनक वक्तव्य, WTC Final आधी नको ते बोलला अन्…
त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही नुकसान भरपाईला तोंड द्यावे लागणार नाही असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. यंदाचा मान्सून वेळेवर हजर होणार असून याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. दरवर्षी मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना हवामान तज्ञांनी दिलासा दिला आहे. यावर्षीचा मान्सूनचा काळ हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे.
Viral Video । चालत्या स्कूटीवर रोमान्स, कपलची बसण्याची स्टाईल बघून लोक म्हणाले…
रामदास साबळे यांच्या मान्सून अंदाजानुसार 20 ते 22 मे अगोदरच मान्सून आगमनाला सुरुवात होऊन ही सुरुवात अंदमान व निकोबार पासून सुरु होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेवर आगमन होईल अशी शक्यता दर्शविण्यात आली आहे. मान्सूनचे आगमन लवकरच होणार असून शेतकऱ्यांनी शेतीची जोरात तयारी सुरू केली आहे. राज्यात मान्सून वेळेवर कोसळणार असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही असे तज्ञांनी सांगितले आहे.