
Loksabha Election २०२४ Mahavikas Aghadi: लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. यातच आता युती आणि आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असल्यामुळे मविआचं जागा वाटप कसं होणार, याबाबत खूप चर्चा चालू आहे. सध्या महाविकास आघाडीचा लोकसभेसाठीचा फॉर्मुला समोर आला आहे.
विरोधकांकडून नेहमीच महाविकास आघाडीबाबत तिन्ही पक्षांना एक समान वागणूक मिळत नाही असं बोललं जातं. या टिकात्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने एक प्रस्ताव पुढे आणला आहे. काँग्रेसच्या प्रस्तावामध्ये लोकसभेसाठी एकसमान जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडी बरोबर चर्चा झाली आहे. १६-१६-१६ जागांचा फॉर्मुला काँग्रेसला मान्य असल्याची सूत्रांची माहिती आली आहे.
भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, राज्यांमध्ये दंगली घडवून त्यांना…
जर समान जागावाटप झाल्या तर एकत्र असल्याचा संदेश दिला जाईल अशी काँग्रेसने भूमिका ठेवली आहे. त्यामुळे जनमानसांत एकता आणि समानतेचा संदेश जाईल. याशिवाय तिन्ही पक्ष जर एकत्र लढले तर जास्त जागा निवडून येतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे. सध्या काँग्रेसचा जरी एकच खासदार असला तरी भविष्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यामुळे जागांची वाटप जर समान झाली तर महाविकास आघाडीसाठी ते फायदेशीर ठरेल. असं काँग्रेसचं मत आहे. या नवीन फॉर्मुल्यासह एक किंवा दोन जागांचा कोटा कमी करण्या संदर्भातची महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
Gujarat Titans IPL 2023 । भर मैदानात हार्दिक पंड्या-आशिष नेहरामध्ये वाद, नेमकं काय झालं दोघांमध्ये?