मांडवगण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी!

Chhatrapati Sambhaji Maharaj's birth anniversary was celebrated in a simple way at Mandavagan!

आज मांडवगण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने डीजे न लावता साजरी झाली. त्यानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. गावातील वाड्या वस्तीवरील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

प्रथम प्रतिमापूजन रुग्णांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आलेल्या मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज यांचे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा तेथील उपस्थित लोकांना दिल्या. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब यांनीही भेट दिली.

चोरी गेलेला किंवा हरवलेला मोबाईल सापडणार शून्य मिनिटात; सरकारचा ‘हा’ नवीन फंडा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या…

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांडवगण सेवा सोसायटीचे चेअरमन झुंबरराव बोरुडे, व्हाय चेअरमन विनोद देशमुख, माजी सरपंच सुरेश लांडगे, पत्रकार राजेंद्र घोडके, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन कार्ले, सीमा ताई गव्हाणे, योगेश देशमुख, रजाकभाई शेख, मांडवगण येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कळमकर,सं भाजी आणि ब्रिगेड तालुका अध्यक्ष नाना शिंदे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन संग्राम देशमुख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी आघाडी संभाजी ब्रिगेड यांनी केले होते या जयंतीनिमित्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेकिंग! उर्फी जावेदच्या अतरंगी कपड्यांविरोधात महिलांनी काढला मोर्चा, केली ‘ही’ मोठी मागणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *