भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेट बघण्यासाठी लोकांमध्ये भरपूर उत्साह असतो. भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असल्यामुळे त्यातील बदलांवर सर्वांचे लक्ष असते. काही नियम हे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तर काही नियम हे खेळाच्या खेळाच्या भावनेसाठी तयार केले गेलेले आहेत. दरम्यानच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच क्रिकेटच्या नियमांमध्ये मध्ये काही बदल केले आहेत. यामध्ये फ्री हिटचा नियम बदलला आहे. याबरोबरच सॉफ्ट सिंगल काढण्याबरोबर, धोकादायक परिस्थितीत हेल्मेट घालनं अनिवार्य केलेले आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
नवीन नियम १ जून २०२३ पासून लागू होणार आहेत फ्री हिटच्या नियमात काय बदल झाले आहेत? नवीन नियमांनुसार, फ्री हिटवर बाॅल स्टंपवर आदळला व त्यावर बॅट्समनने रन काढली, तर ती रन बॅट्समनच्या स्कोर मध्ये मोजली जाणार आहे. म्हणजेच आऊट झाल्यानंतरही बॅट्समन रन काढू शकतो. हेल्मेट घालणे बंधनकारक. आयसीसीने दुसऱ्या नियमामध्ये क्रिकेटमधील अवघड परिस्थितीत हेल्मेट घालणे अनिवार्य केलेले आहे. त्या अंतर्गत विकेटकीपरला नेहमी हेल्मेट घालावे लागेल.
त्याबरोबरच फास्ट बॉलर्सच्या समोर बॅट्समन ने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. याशिवाय, बॅट्समन जवळ फील्डिंग करणारा कोणताही फिल्डर आता हेल्मेट घालणार आहे. यामुळे खेळाडूंच्या संरक्षणाची खात्री आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नवीन नियमांनुसार सॉफ्ट सिग्नल रद्द केली आहे. या अंतर्गत याचा निर्णय थर्ड अंपायर कडे जायचा ज्यामुळे टीव्ही अंपायर साठी हा निर्णय कठीण जात होता.
ब्रेकिंग! उर्फी जावेदच्या अतरंगी कपड्यांविरोधात महिलांनी काढला मोर्चा, केली ‘ही’ मोठी मागणी
या सिग्नल वर बऱ्याच तज्ञांनी देखील टीका केली होती, त्यामुळे हा नियम तसा वादग्रस्तच होता. ही अशी परिस्थिती असायची की ज्यामध्ये खेळाडू जमिनीपासून काही इंच उंचीवर बाॅल धरायचे. या परिस्थितीमध्ये बॉल जमिनीला लागला आहे की नाही यासंदर्भातला नियम हा मैदानातील अंपायरचाच अंतिम समजला जायचा त्यामुळे सॉफ्ट सिग्नल रद्द करण्यात आला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर