अमरावती ( Amaravati) येथील एका अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी रस्ताने चालत असणाऱ्या मुलीला अडवून धमकी देत तिची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. ‘तुझ्या रूममधील मैत्रिणीला घराबाहेर काढ, आपण दोघे रूम मध्ये राहू’ असे सांगत या मुलीकडे शरीरसुखाची (Physical Relationship) मागणी केली गेली आहे. एवढंच नाही तर तिच्याकडून जबरदस्तीने मोबाईल क्रमांक देखील घेण्यात आला आहे. ( Unknown man asked girl for physical relationship)
Crime | कपडे धुणाऱ्या महिलेसोबत विनयभंग ; म्हणाला, “तुला एक दिवस उचलून घेऊन जाईल…”
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलगी पायी चालत तिच्या खोलीकडे जात होती. यावेळी ४०-४५ वयाचा अनोळखी व्यक्ती तिच्यासमोर आला. या व्यक्तीने तिला आवाज देऊन एवढ्या रात्री का फिरत आहे ? असे विचारले. यावर “काका मला मेडिकलमध्ये काम होते, त्यामुळे मी बाहेर गेले होते.” असे मुलगी म्हणाली. मात्र ती अनोळखी व्यक्ती ” तू तुझ्या मित्रासोबत रात्री बाहेर फिरते, तुझा पोलिसांत रिपोर्ट देईल” अशी धमकी त्या मुलीला देऊ लागली.
Gautami Patil | सेलेब्रिटींसाठी गौतमी पाटील नॉट रीचेबल ! नक्की काय आहे प्रकरण ?
कहर म्हणजे फक्त इथेच न थांबता ती व्यक्ती पुढे म्हणाली की, “फिजिकल रिलेशन ठेऊ दे…. मी तुला हवे तेवढे पैसे देईल. तुझ्या मैत्रिणीला रूमबाहेर काढ. आपण दोघेच रूममध्ये राहू.” यानंतर त्या व्यक्तीने बळजबरी करत मुलीकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. तसेच तिच्या मोबाईलवर मिसकॉल देत तिचा हात पकडला. यावेळी घाबरलेल्या मुलीने तिथून पळ काढला. तसेच या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये माहिती देत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
मोठी बातमी! क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल, WTC Final मध्ये ‘या’ तीन नियमांचा समावेश; जाणून घ्या…