सोलापूरच्या शेतकऱ्याने चक्क आंब्याला दिलं शरद पवार यांचं नाव; कारणही केलं स्पष्ट…

The farmer of Solapur gave the name of Sharad Pawar to the mango; The reason is clear...

आंबा म्हटलं की केशर आंबा, हापुस आंबा, (mango) अशा वेगवेगळ्या प्रजातीच्या आंब्याची नाव समोर येतात. भारतामध्ये हजारो पेक्षा जास्त आंब्याच्या जातीचे प्रकार पाहायला भेटतात. मात्र सोलापूर (Solapur) मध्ये चक्क शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव आंब्याला देण्यात आल आहे.

Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी

सोलापूर मधील दत्तात्रय गाडगे यांनी त्यांच्या आंब्याला शरद पवारांचे नाव दिलं आहे. दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या झाडावरती २० ते २५ वेगवेगळे प्रयोग केले. व त्यानंतर त्यांच्या एका आंब्याचे वजन किमान दोन ते अडीच किलो आहे. व या आंब्याला त्यांनी शरद पवार आंबा(Sharad Pawar Mango) असं नाव दिला आहे. सोलापूरमधील आंबा महोत्सवामध्ये शरद पवार आंबा याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?

दत्तात्रय गाडगे म्हणाले की ज्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री (Sharad Pawar is the Chief Minister of the state) होते त्यावेळी त्यांनी फळबाग योजना (Orchard scheme) सुरू केली होती. व त्या योजनेमधूनच आम्ही जवळपास सात एकर जमिनीमध्ये 7000 केसर आंब्याची रोप लावली. त्यामुळे जो अडीच किलोचा आंबा आहे त्याला विशेष नाव म्हणजेच शरद पवार आंबा असे नाव देण्यात आले आहे. या आंबा महोत्सवामध्ये शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणेच जसे लक्ष वेधून घेतात . त्याचप्रमाणे हा आंबा त्याच्या वजनामुळे लक्ष वेधून घेत आहे.

Maharashtra Politics | मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली, कोणी केला गौप्यस्फोट?

या आंब्याच्या झाडावरती होमिओपॅथिकच्या औषधांचा वापर केला आहे. तसेच बारामती मधील कृषी विज्ञानकेंद्र आणि बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी यावर संशोधन देखील केल आहे. बारामतीतील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी याला भेट दिल्यानंतर याचं शरद पवार आंबा असे नामकरण करण्यात आले होते.

Maternity Leave | खुशखबर ! महिलांच्या प्रसूती रजेत होणार वाढ ; नीती आयोगाने केली शिफारस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *