महाराष्ट्रात सध्या सर्वत्र एकच दणका उठला आहे, तो म्हणजे पोलीस भरती बरीच मुलं या परीक्षेमध्ये पास होऊन पोलीस अधिकारी झालेली आहेत. पण त्यातच आता एक गंभीर बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये अनेक मुलांनी कॉपी केलेली आहे. मुंबई पोलीस भरती (Mumbai Police bharti) प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेत अनेकांनी कॉपी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या लेखी परीक्षांचे हायटेक कॉपी झाल्याचे प्रकार मुंबई पोलिसांनी समोर आणले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास चालू केला आहे. त्याचबरोबर दोशींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केलेली आहे.
Murder case | विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रेयसीचा खून; गुगल सर्चमुळे गुन्हेगार अडचणीत!
मुंबईमध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला आहे. ७ मे रोजी पोलीस भरतीचा पेपर मुंबईमध्ये पार पडला. परीक्षार्थींकडे आधुनिक यंत्र होते. प्रश्नपत्रिकांचे फोटोज बटन कॅमेऱ्याच्या मदतीने केंद्राबाहेर पाठवण्यात आले.
परीक्षा केंद्राने अशी माहिती दिली आहे की, ते फोटोज मेलद्वारे केंद्राबाहेर आले होते. त्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर केंद्राबाहेर असणाऱ्या शिक्षकांनी मायक्रो हेडफोनच्या माध्यमातून पटापट उत्तरे दिली. बऱ्याच उमेदवारांच्या कानांमध्ये मायक्रो हेडफोन्स होते. त्याच्या मदतीने त्यांना उत्तर मिळत होती. याप्रकरणात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप केला आहे.
त्यामुळेच पोलीस कर्मचाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे. संघटनांकडे पुढील तपासासाठी अधिकचे पुरावे मागितलेले आहेत. मागच्या काही वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रियेला बराच विलंब लागलेला आहे. कोणत्याही खात्यासाठी जागा निघाल्या तर उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ उडतो. पोलीस भरतीत गैरप्रकार झालेला आहे. मायक्रो डिवाइसच्या माध्यमातून पेपर फुटला आहे. मुंबई पोलिसांचा या प्रकरणासंदर्भात कसुन तपास चालू आहे.