गौतमी पाटील ( Gautami Patil) आणि तिच्या कार्यक्रमातील राडे हे समीकरण काही नवीन नाही. प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलची महाराष्ट्रात जबरदस्त फॅन फॉलोविंग ( Fan Following) आहे. महाराष्ट्रभर तिचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी पहायला मिळते. यामुळे बऱ्याचदा अनुचित प्रकार देखील घडतात. दरम्यान नुकताच नाशिक (Nashik) येथे गौतमी पाटीलचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे. (Misbehave by Gautami Patil’s fans)
Tuljapur | मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिरात शॉर्ट कपडे घातल्यास भविकांना नो एन्ट्री
गौतमी पाटीलच्या नाशिक मधील कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी मीडियाच्या फोटोग्राफर्सवर हल्ला केला. दारू पिऊन या लोकांनी फोटोग्राफर्ससोबत मारहाण केली. यामध्ये भरपूर लोक जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी चुकीची घटना घडून देखील गौतमीचा डान्स शो सुरूच होता.
काही दिवसांपूर्वी महालगाव येथे देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडला होता. याठिकाणी कार्यक्रम पहायला आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने काही उत्साही चाहते थेट पत्राच्या दुकानावर चढले. ही गर्दी इतकी जास्त होती की लोकांच्या वजनाने पत्र्याचे शेड कोसळले. यामध्ये काही लोक जखमी झाले होते.
याव्यतिरिक्त राज्यातील अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांत चुकीच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर गौतमी पाटीलवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली आहे. मात्र असे असले तरीही तिच्या प्रसिद्धीवर तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही. कितीही काहीही झाले तरी महाराष्ट्रतील लोकांसाठी ‘गौतमी पाटील सबसे कातील’ आहे!
Breaking । शंभूराज देसाईंची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरू