राजकीय वर्तुळात सध्या अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. अगामी लोकसभा निडवणुकांच्या अनुषंगाने भाजपने ‘महाविजय २०२४’ चे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे (Pune) येथील बालगंधर्व मंदिरमध्ये भाजपची ( BJP) ‘प्रदेश कार्यकारिणी बैठक’ पार पडली. यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी व आघाडीमधील नेत्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ( Devendra Fadanvis roasts sharad pawar)
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सध्या राज्यात सगळीकडे भाकरी फिरवण्याबाबत चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतो, दुसरा पक्ष भाकरीचे तुकडे करतो आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरीच हिसकावून घेतो. पण आम्ही भाकरी फिरवत नाही तर गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. फक्त भाजपलाच गरिबांच्या भाकरीची चिंता आहे. ” तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे विश्वासघाताचे सरकार होते असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Tuljapur | मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिरात शॉर्ट कपडे घातल्यास भविकांना नो एन्ट्री
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्या नाट्यावरून देखील त्यांना फटकारले आहे. “राजीनामा देतो म्हणणे आणि राजीनामा देणे यात फरक असतो हे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दाखवून दिले आहे.” एवढेच नाही तर आता देशात फक्त ‘मोदी पॅटर्न’ असेल असे वक्तव्य देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.