ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या सतत विरोधकांवर टीका करत असतात. विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. आता सुषमा अंधारे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्या असा आरोप जाधव यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन
शिवसेनेच्या राज्यभर निघालेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप शनिवारी होणार आहे. याकरिता सुषमा अंधारे देखील या सभेला आहेत. दरम्याम, या सभेची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे या बीडमध्ये आल्या. यावेळी त्यांच्या समोरच जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख यांच्यात हाणामारी झाली. यावेळी या हाणामारीमध्ये जाधव यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. वरेकर यांनी या भांडणांमध्ये जाधव यांच्या वाहनावर लाकडी फळी देखील मारली आणि त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
धक्कादायक! बारामतीमध्ये ३८ लाखांचे प्रतिबंधीत पदार्थ जप्त; पोलिसांनी केली मोठी कारवाई
दरम्यान, यानंतर जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, सोफे, फर्निचरसाठी पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विक्री काढल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
उध्दव ची खंडणीखोर टोळी ! @rautsanjay61 pic.twitter.com/jwraUZzMwx
— nitesh rane (@NiteshNRane) May 18, 2023