त्र्यंबकेश्वर (Tryambkeshwar Incident) येथील घटनेवरून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. राज्यातील नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले आहे.
सर्वात मोठी बातमी! २००० हजारांची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत
त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला येथे घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नयेत ही राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे. भावनिक मुद्दा उपस्थित करुन कुणीही जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील पुरोगामी जनता ते अजिबात सहन करणान नाही असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! विराटची पत्नी अनुष्का शर्माला भरावा लागणार हजारोंचा दंड
त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत आता काही संघटना समोर आल्या आहेत. कोणीतरी तेथे गौमुत्र शिंपडले, पण कुणाला काय शिंपडायचं आहे ते शिंपडा! तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र राज्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपणसुद्धा अजमेरला चादर चढवायला जातो.
सावधान! उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; एकदा वाचाच
त्या ठिकाणावरील स्थानिक लोकांनी व आमदरांनी मला फोन करुन माहिती दिली आहे. येथील परंपरा शंभर वर्षे जुनी आहे. मात्र, अशाप्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन लोकांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. हे ताबोडतोब थांबवले गेले पाहीजे. विकासकामांवर मते मागा धार्मिक तेढ निर्माण करु नका. असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.