मुंबई : राज्यात शिंदे गटाने (shinde group) बंड केल्यानंतर सत्तापरिवर्तन झाली म्हणजेच शिंदे गट आणि भाजपाने (BJP) युती केली.त्यानंतर राज्यातील अनेक घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.अशातच मराठा समाजाच्या रखडलेल्या अनेक मागण्या असतानाच संभाजीराजेंविरोधात (Sambhaji raje) मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Nitesh Rane: शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतिवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…
शुक्रवारी रात्री देखील मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. दरवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. पण मात्र कालच्या बैठकीत बोलूच दिलं नसल्याचा आरोप नंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. तसेच, छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याचा दावादेखील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्जुन खोतकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते उपस्थित होते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक बोलावलेली असताना सर्वांना बोलू द्यायला हवे होते. मात्र, समाजाच्या लोकांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही,तसेच मराठा आरक्षणावर चर्चाच झाली नसल्याची तक्रार मराठा संघटनांच्या नेतेमंडळींनी केली आहे.
Indapur: इंदापुरात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लुटले 3 कोटी 60 लाख, पोलिसांत फिर्याद दाखल
छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व
मराठा क्रांती मोर्चाच नेतृत्व करण्याची जबाबदारी संभाजीराजांना कुणी दिली? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आम्हाला अजिबात मान्य नाही. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठका घेता, नेमकं चाललंय काय तुमचं?” असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उपस्थित केला आहे.
खोका, मोका आणि धोका! सामनातून शिवसेनेने गद्दार म्हणत केली जहरी टीका
राजकीय पोळ्या भाजून घेऊ नका
आम्ही सगळे मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातून हा मोर्चा सुरू झाला आहे. आम्ही जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणार असताल तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई होईल अशी अवस्था करू”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.