राज्याच्या राजकारणामध्ये खूप वेगाने घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट सतत एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघांचीही एकमेकांवर टीका सुरू आहे. (Aditya Thackeray and State Culture Minister Sudhir Mungantiwar are facing each other)
घराचं खोदकाम चालू होतं, सापडला करोडो रुपयांचा मुघलकालीन खजिना, अन् मजूराने…
सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना एक आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, राज्य सरकारविरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. आणि त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून दाखवा. असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना दिली.
तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “हाफ चड्डी घालू नका, असं…”
आता हे आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं असून मी राजीनामा देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांसह निवृत्त IAS, IPS यांचा भाजपमध्ये प्रवेश