आपल्या आजूबाजूला अनेक प्रेमप्रकरणे (Love stories) आपण पाहतो. यातून अनेक चुकीच्या घटना देखील घडतात. दरम्यान बहुतेक प्रेमप्रकरणांमध्ये घरच्या लोकांचा विरोध असतो म्हणून प्रेमी युगुल (Lovers) पळून जाऊन लग्न करतात. अगदी असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chh. Sambhajinagar) येथे घडला होता. वर्षभरापूर्वी येथील एक प्रेमीयुगुल पळून गेले होते. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. आता एक वर्षानंतर मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Gautami Patil | छोट्या पुढारीवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, “मी काय महाराष्ट्राचा…”
वाळूज भागातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पुण्यातील आळंदी येथे पळवून नेले होते. त्यावेळी मुलीचे वय १७ वर्षे होते. यानंतर दोघेही वर्षभर एकमेकांसोबत राहिले. दरम्यान मुलीला १८ वर्षे पूर्ण होताच दोघांनी मिळून तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आळंदी येथील मंगल कार्यालयात लग्न केले आणि छत्रपती संभाजीनगरला परतले.
परंतु हे दोघे पळून गेले तेव्हाच मुलीच्या आईने पळवून नेणाऱ्या तरुणाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे पळून गेलेले दोघेही छत्रपती संभाजी नगरमध्ये पोहोचलेले समजताच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. काल (ता.१९) जोगेश्वरी भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली अतिशय वाईट बातमी! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा सर्वात मोठा धक्का