अलीकडे काळातील शेतकरी ही पारंपारिक शेतीकडे (Traditional farming ) भर न देता आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे भर ( Emphasis on modern methods of agriculture ) देताना दिसून येतात. आधुनिक शेतीमधून कमी कष्टांमध्ये जास्त उत्पन्न मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात कल असतो. भाजीपाला, फळबागा यामध्ये जास्त तन येऊ नये यासाठी मल्चिंग पेपरचा ( Mulching paper) वापर करण्यात येतो. व या मल्चिंग पेपर मुळे भाजीपाला व फळबागा लवकर वाढण्यास मदत होते.
पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, व्हिडिओ पाहून खाजवाल डोकं
मल्चिंग पेपरमुळे कष्ट कमी होते व काढण्याच्या खर्चात देखील कपात ( Also cut costs) होते. मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन न होण्यास मदत होते. अलीकडील काळामध्ये प्लास्टिक व मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने मल्चिंग पेपरसाठी अनुदान योजना सुरू केली आहे.
मल्चिंग पेपरचे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 50% अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर वापरासाठी बत्तीस हजार खर्च येतो परंतु आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना 16 हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना वैयक्तिक उपलब्ध होईल. तसेच शेतकरीसमूह, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांना देखील अर्थसहाय्य केले जाणार आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, व्हिडिओ पाहून खाजवाल डोकं
मल्चिंग पेपर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov. या संकेत स्थळाला भेट देऊन या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी शेतजमीनीचा सातबारा, ८ अ, आधार कार्डची छायांकीत प्रत आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
PUBG प्रेमींसाठी खुशखबर; पुन्हा चालू होणार BGMI, ‘हे’ आहेत नवे बदल…