CSK VS DC : काल डेविड वॉर्नर (David Warner) शतकाच्या उंबरठ्यावर होता त्याच क्षणी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) हवेत उडी मारून वॉर्नरचा अतिशय उत्कृष्ट कॅच पकडला. Ruturaj Gaikwad Takes David Warners Fabulous Catch (IPL 2023) चा 67 वा मुकाबला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमध्ये (Arun jetli stedium) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Dehli Capitals) यांच्या मध्ये झाला होता.
चेन्नईने पहिल्यांदा बॅटिंग करुन दिल्लीच्या बाॅलर्सचा धुव्वा उडवून 20 ओव्हर मध्ये 3 विकेट्स गमावत 223 रन्स केल्या. सलामीवीर जोडी ऋतुराज व डेवॉन कॉन्वेच्या दमदार Performance मुळे चेन्नई 200 धावांचा टप्पा पार करू शकली. नंतर जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सची खूप धावपळ झाली. 146 रन्सवर वर 9 विकेट्स गमावल्या आणि सामन्यात दिल्लीचा पराभव झाला.
कॅप्टन डेव्हिड वॉर्नरन शानदार पारी खेळत अर्धशतक मारलं. पण, वॉर्नर त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. कारण वॉर्नर 86 धावांवर असताना पाथिरानाच्या बाॅलवर तो कॅचआउट झाला. वॉर्नर शतकाच्या दारात असताना ऋतुराजने हवेमध्ये उडी घेऊन वॉर्नरचा अप्रतीम असा कॅच घेतला. ऋतुराजचा हा कॅच घेतलेला व्हिडिओ Indian Premier League च्या ट्वीटर(Twitter) अकाऊंटवर खूप शेअर केला जात आहे.
पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, व्हिडिओ पाहून खाजवाल डोकं
चेन्नई सुपर किंग्जकरता ऋतुराजने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत 50 बाॅल मध्ये 7 सिक्स व 3 चौकार मारत 79 रन्स काढत अर्धशतकीय पारी खेळली. त्याचबरोबर कॉन्वेनंही 52 बाॅलमध्ये 3 सिक्स व 11 फोर मारत 87 रन्स केल्या. या दोघांची तुफान पारी संपल्यानंतर शिवम दुबे नावाचं वादळ आलं, आणि त्यानेही 9 बाॅलमध्ये 22 रन्स काढल्या. त्याचबरोबर जडेजानेही धडाकेबाज बॅटिंग करुन 7 बाॅलमध्ये 20 रन्स केल्या. कॅप्टन धोनी 5 बाॅलवर नाबाद राहिला.
You can't keep @Ruutu1331 out of action today 😎
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
What a catch that to dismiss the well-set Warner!
Follow the match ▶️ https://t.co/ESWjX1m8WD #TATAIPL | #DCvCSK pic.twitter.com/tNOhRzwoAF
PUBG प्रेमींसाठी खुशखबर; पुन्हा चालू होणार BGMI, ‘हे’ आहेत नवे बदल…