मुंबई : येत्या दोन दिवसांत गणपती बाप्पाच आगमन होणार आहे. दरम्यान याच पार्श्भूमीवर म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त (Ganesh festival) राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन (Mumbai pune express Highway)जाणाऱ्यांना ताप्तुरती टोल माफी (Toll Free) करण्यात आली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना तूर्तास टोल आकारु नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. आज दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे.
….म्हणून केली टोलमाफी
शनिवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी ही ठरलेलीच असते. दरम्यान आता महामार्गावर काम सुरु आहे त्यामुळे ही कोंडी अधिकच वाढली आहे. सकाळपासूनच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. अशातच अमृतांजन पुलाजवळ अपघात झाल्याने ही कोंडी अधिक वाढली. त्यामुळे आज शनिवारी दिवसभरासाठी मुंबई पुणे महामार्गवरुन टोल आकारला जाऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.
Uday Lalit: मोठी बातमी! कोकणच्या उदय लळीत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ
यामुळे मुंबई पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आला आहे. तसेच दुसरीकडे टोलवरही अनेकदा फास्टॅग काम न करणं, रोख रक्कम देण्यात वेळ वाया जाणं, यामुळेही वाहनांच्या रांगा लागतात.म्हणून आज एका दिवसाची टोलमाफी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी “गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, तसेच वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स असावेत.तसेच आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
Sambhaji Raje: “कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे”, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक