
Mexico Gun Fire : अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना सर्रास घडतात. बऱ्यापैकी नागरिकांकडे स्वतःच्या बंदुका आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) एका अपरिचित व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे.
आई कूठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे नव्या भुमिकेत, पोस्ट शेअर करत दिली ‘ही’ माहिती
या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी आहेत. अशी माहिती सांगण्यात येत आहे. मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियामध्ये (Baja California) ही गंभीर घटना घडली. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेल्या या परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण खूप जास्त आहे. हा परिसर अंमली पदार्थांच्या विक्रीसाठीच ओळखला जातो.
मेक्सिकोच्या (Mexico) बाजा कॅलिफोर्निया परिसरामध्ये एका कारचा Show चालू होता. दरम्यान अचानक गोळीबार झाला,आणि ही घटना घडली. मृत्यू पावलेल्या व्यक्तींची ओळख अजूनही पटलेली नाही. जखमी झालेल्या व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यामध्ये मेक्सिकोत गोळीबारामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील सहभाग होता.फार्मिंगटन (Farmington) शहरामध्ये ही घटना घडली होती.
पावसासंदर्भात मोठी बातमी! पुढील दोन-तीन दिवसात पडणार जोरदार पाऊस; वाचा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स
माहितीनुसार, दुपारी २ च्या सुमारास काही लोक बंदुकांसह एका व्हॅनमधून आले आणि गोळीबार चालू केला. या प्रकरणात अटॉर्नी जनरल इवान कारपियो यांनी असे सांगितले आहे की, या घटनेच्या तपासासाठी एक विशिष्ट टीम तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्या व्यक्तींची अजूनही ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.