‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका आज प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली 14 वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (TMKOC) हा मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार गेल्या काही दिवसांपासून रामराम ठोकताना दिसत आहेत.
ब्रेकिंग! अमेरिकेत पुन्हा गोळीबार; मेक्सिकोमध्ये १० जणांचा जागीच मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी
मात्र मागच्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आधी मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने निर्मात्यांवर जोरदार टीका केली आहे.
आई कूठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे नव्या भुमिकेत, पोस्ट शेअर करत दिली ‘ही’ माहिती
मालिकेमध्ये काम केललेल निर्मात्यांनी पैसे दिले नाहीत आणि शूटिंगदरम्यान त्रास दिल्याचं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिने दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीबाबतही देखील एक मोठा खुलासा केला आहे. जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी दिशासोबतही गैरवर्तणूक केली. मात्र तिने याकडे लक्ष दिल नाही ती याकडे दुर्लक्ष करायची. असा मोठा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.