अहमदनगरच्या दंगलीवरून शरद पवार संतापले; म्हणाले, “या धर्माचा…”

Sharad Pawar angry over Ahmednagar riots; Said, "Of this religion..."

Ahmednagar Riot : देशात सध्या बऱ्याच ठिकाणी दंगली घडत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये देखील मागच्या काही दिवसांत दंगली झाल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आरोप करत म्हणाले की, येथील काही लोक धर्माच्या नावाखाली दंगली घडवून आणत आहे. यावेळी शरद पवारांनी कर्नाटकचं (karnatak) उदाहरण दिलं आणि म्हणाले, कर्नाटक मध्ये देखील या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून जनतेमध्ये द्वेष पसरवला आहे. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. कर्नाटकमध्ये जसा भाजपचा पराभव झाला, तसाच इतर राज्यांमध्ये देखील होऊ शकतो असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

सर्वसामान्यांसाठी दिलासदायक बातमी! खाद्य तेलाच्या किमतीमध्ये कपात, जाणून घ्या काय आहेत दर?

शरद पवार म्हणाले, “धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण केला जात आहे. नगर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. कितीतरी ऐतिहासिक लोकांची हयात नगरमध्ये काम करण्यात गेली आहे. याच नगर जिल्ह्यात दोन-तीन दिवस शेगावची बाजारपेठ बंद राहते . “काही शक्ती जातीधर्मांना पुढे घालून लोकांमध्ये संघर्ष वाढवत आहेत. त्या शक्तींना आव्हान करण्याची जबाबदारी माझ्यासह तुमच्यावर देखील आहे. जर हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचे जीवन उध्वस्त होईल. त्याकरता आपण तयारी केली पाहिजे,” अशी शरद पवारांची भूमिका आहे.

तारक मेहता मालिकेमधील दयाबेन बाबत समोर आली धक्कादायक माहिती; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

“कर्नाटकमध्ये धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झालाय. जो कष्टकरी आणि तेथील लोकांची जपणूक करणारा आहे. अशा लहान जाती वर्गातील एका व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे कष्टकरी लोकांच्या कष्टाचचं फळ आहे. कर्नाटक मध्ये कष्टकरी लोकांची एकजूट दिसून आली. जशी कर्नाटक मध्ये एकजूट दिसून आली तशीच इतर राज्यांमध्ये देखील दिसली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. “असेही शरद पवार म्हणाले.

ब्रेकिंग! अमेरिकेत पुन्हा गोळीबार; मेक्सिकोमध्ये १० जणांचा जागीच मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *