इन्स्टाग्राम (Instagram) हे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अँप ओळखले जाते. जगभरात इन्स्टाग्रामचे लाखो युजर्स आहेत. युवकांमध्ये तर या अँपची विशेष क्रेझ आहे. मात्र सध्या इन्स्टाग्राम डाऊन (Instagram get Dowen) झाल्याने युजर्सची चांगलीच गैरसोय झाली आहे. काल(ता.२२) पासून इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली आहे. रात्रीपासून युझर्स इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लाईव्ह जाण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु यामध्ये युजर्सना भरपूर अडचणी येत आहेत.
मोठी बातमी!२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रक एक्सीडेंटमध्ये अपघाती मृत्यू
एवढंच नाही तर इन्स्टाग्राम वरून मेसेज केल्यास तो डिलिव्हर व्हायला व रिप्लाय यायला देखील उशीर होतोय. यामुळे इन्स्टाग्रामचे युजर्स वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर जवळपास एक लाख ८० हजार युजर्सनी इन्स्टाग्रामला रिपोर्ट केले आहे. यामध्ये अमेरिकेच्या युजर्सचा जास्त समावेश आहे. इन्स्टाग्रामच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर सर्व युजर्सना आधी आपल्याला नेटवर्क इश्यू आहे,असे वाटले.
Onion | कांदा उत्पादक शेतकरी भडकले! गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांवर कांदे फेकण्याचा केला ठराव…
परंतु इतर अँप व्यवस्थित चालू असल्याने इन्स्टाग्राम ठप्प झाल्याचे उघड झाले. दरम्यान ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी पाहून, मेटाच्या प्रवक्त्याने ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे स्पष्ट केले. तसेच ग्राहकांना त्रास झाल्याबद्दल या प्रवक्त्याने यूजर्सची माफीही मागितली आहे. कंपनीने या आऊटेजवर अधिकचा खुलासा केलेला नाही. परंतु, ग्राहकांच्या मेलला उत्तर दिलं आहे. याआधी देखील १८ मे ला इन्स्टाग्राम डाऊन झाले होते.
शेतकऱ्यांनो शेतात काम करत असताना साप चावला तर करा ‘हे’ उपचार; होईल फायदा