
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महिलांनी गावामध्ये चालणाऱ्या अवैद्य दारू विक्रीबद्दल (illegal liquior buisness) अजित पवारांकडे तक्रार केली. यावरून भर कार्यक्रमामध्ये त्यांनी पोलीस यंत्रणेला धारेवर धरले. “पवार साहेब, सुप्रिया आणि मी स्वतः या परिसरातल्या दारू भट्ट्या बंद करतो पण शासनाचा पगार मात्र पोलीस घेतील, एवढेच आता आमच्याकडून राहिले आहे,” असा टोला अजित पवारांनी यावेळी लागवला आहे.
शेतकऱ्यांनो शेतात काम करत असताना साप चावला तर करा ‘हे’ उपचार; होईल फायदा
बारामती (Baramati) मधील पाहुणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या परिसरातील अवैद्य दारू विक्री बंद व्हावी यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. दारू धंदेवाल्यांवर कारवाई इतकी आक्रमक करा की, उद्या अजित पवारांची भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला. परंतु, एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका. एवढ्या आक्रमक भाषेत अजित पवार यांनी पोलीस यंत्रणेला सुनावले आहे.
Instagram Down | इन्स्टाग्राम झाले ठप्प! पोस्टही होईना…रिप्लायही येईना…युजर्स मात्र हैराण
तसेच पुढच्या कार्यक्रमाला मी या परिसरात आलो तर लोकांनी मला पोलिसांच्या कामगिरी बद्दल चांगले सांगणे अपेक्षित आहे. असे अजित पवार म्हणाले. पाहुणेवाडी परिसरात दारू भट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असल्याने या परिसरातील अवैद्य दारू धंदा बंद व्हावा, अशी मागणी गावातील महिलांकडून करण्यात आली होती.
मोठी बातमी!२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रक एक्सीडेंटमध्ये अपघाती मृत्यू