
मागच्या तीन चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस प्रकरणी पुन्हा ‘ईडी’ची नोटीस आली होती. यामुळे त्यांना २२ मे ला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
ईडीने याआधी देखील जयंत पाटील यांना नोटीस बजावली होती. मात्र यावेळी जयंत पाटील यांनी जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी, असे पत्र पाठवून चौकशीची वेळ देखील वाढवून घेतली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे आता याबाबत त्यांची चौकशी होणार आहे.
Instagram Down | इन्स्टाग्राम झाले ठप्प! पोस्टही होईना…रिप्लायही येईना…युजर्स मात्र हैराण
दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांनो शेतात काम करत असताना साप चावला तर करा ‘हे’ उपचार; होईल फायदा
कार्यकर्त्यांनी ईडीची बॅनरबाजी केली आहे. त्याचबरोबर मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बऱ्याच ठिकाणचे कार्यकर्ते जमा झाले आहेत.
मोठी बातमी!२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रक एक्सीडेंटमध्ये अपघाती मृत्यू