Neeraj Chopra is the world’s top javelin thrower : गोल्ड मेडलिस्ट (Gold Medalist) असणारा नीरज पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये जगात पहिल्या नंबरचा खेळाडू बनला आहे. नीरज ने परत एकदा देशाची शान आणि अभिमान वाढवला आहे. नीरज चोप्राने परत एकदा इतिहास रचला आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्सने जारी केलेल्या यादीनुसार, नवीन रेकॉर्डिंग मध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा हा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये जगात पहिल्या नंबरचा खेळाडू बनला आहे.
धक्कादायक घटना! ताप येतं होता म्हणून तांत्रिकाला बोलावलं; अंगात भूत आहे म्हणून तरुणाला केले ठार
नीरज चोप्राला पहिल्यांदाच या किताबाने नावाजलं जाणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी हा सुवर्णक्षण आहे. नीरज ने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्वल केलं आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) पहिल्यांदा भारतासाठी ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये (Track and field event) सुवर्ण पदक जिंकून देशाची मान अभिमानाने वर केली होती. लेटेस्ट रॅंकिंगनुसार, नीरजने १४५५ गुण मिळवले आहेत. हा आकडा सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन एंडरसन पीटर्सच्या (Anderson peters) गुणांपेक्षा २२ गुणांनी जास्त आहे. एंडरसनचे सध्याच्या काळात १४२२ गुण आहेत. नीरज चोप्राची कामगिरी प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
Petrol & Disel Fraud | पेट्रोलपंपावर अशी केली जाते फसवणूक ! पैशांसोबत गाडीचे देखील होते मोठे नुकसान
त्याच्या ऑलिम्पिक विजयानंतर, त्याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतोय, नीरजचा उद्देश त्याच्या कामगिरीला अधिक उन्नत करणे आणि जगातील अव्वल भालाफेकपट्टूंपैकी एक म्हणून त्याचे स्थान मजबूत करणे हा आहे. तो भारतातील आणि जगभरातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रेरणास्थान बनला आहे.