मुंबई : मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडला होता.त्यामुळे मार्च 2020 पासून शिक्षक भरतीसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा भरती प्रक्रिया बंद केली होती.दरम्यान आता आता कॉरोना संकट दूर झाल्याने शिक्षण खात्याने पुन्हा शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा (TET Exam) घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागांसाठी ही भरती होणार आहे.यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकामध्ये भरती होणार आहेत.
दरम्यान याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तरी सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी आहेत.म्हणून शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde: मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्या गणेशभक्तांना ताप्तुरता टोल फ्री, कारण…
शिक्षक भरती साठी टीईटी घेऊन निकाल लागल्यानंतर वेळेत सीईटी घेण्यात येईल आणि रिक्त जागा भरती केल्या जातील अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. तसेच राज्यातील अनेक सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आणि विशेष म्हणजे दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.