आजकाल भारतात सुद्धा वाईफ स्वॅपिंगचे (Wife Swapping) प्रमाण वाढले आहे. पाश्चात्य संस्कृतीमधील (Western culture) हा प्रकार आता भारतात देखील सुरू झाला आहे. केरळमध्ये (kerala) पत्नीच्या अदलाबदलीच्या प्रकाराबाबत एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र आता या महिलेची तिच्या वडिलांच्या घरी हत्या (Murder) झाल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक घटना! ताप येतं होता म्हणून तांत्रिकाला बोलावलं; अंगात भूत आहे म्हणून तरुणाला केले ठार
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एका २६ वर्षाच्या महिलेच्या मुलांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हा प्रकार बघून घाबरलेल्या मुलांनी घराशेजारील लोकांना माहिती दिली. यावेळी त्या लोकांनी घटनास्थळी पोलिसांना बोलवले. हत्या झालेली महिला वाईफ स्वॅपिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या पतीपासून वेगळी राहत होती.
Petrol & Disel Fraud | पेट्रोलपंपावर अशी केली जाते फसवणूक ! पैशांसोबत गाडीचे देखील होते मोठे नुकसान
दरम्यान, मृत महिलेच्या वडिलांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत जबाब दिला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या जावयानेच मुलीची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीने ९ वेगवेगळ्या पुरुषांसोबत ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र नवऱ्याच्या या प्रकाराला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार केली होती.
या प्रकरणी तपास करून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह अनेक जणांना अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा पती सध्या जामिनावर बाहेर असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा जीव वाचला असून त्याच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घरातील सोनं मोडून तरुण शेतकऱ्याने कृषी कार्यालयावर उधळले टोपलीभर पैसे; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?