Inauguration of New Parliament : नवीन संसद उभारली, काहीही गरज नव्हती. उभारली ती उभारली आणि उद्घाटनाला राष्ट्रपतींना देखील बोलवलं नाही. हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. नवीन संसद भवनाची गरज काय होती? जुनी संसद अजून १०० वर्षे टिकेल इतकी मजबूत आहे. तरीदेखील या सरकारने नवीन संसद उभारली. देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनापासून का डावललं? नव्या पाट्यांवर नाव लावण्यासाठी उभारली आहे का संसद? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आदिवासी महिला द्रौपदी मूर्म (Droupadi Murmu) यांना राष्ट्रपती केलं असं मोदी सारखं म्हणतात. मग त्याच महिलेची संसदेचे उद्घाटन करताना आठवण का आली नाही? २८ मे रोजी जो नव्या संसद भवनाचा सोहळा रंगणार आहे. त्यामध्ये राष्ट्रपतींना डावललं गेल्यामुळे, त्या सोहळ्यात काँग्रेससह आम्ही बहिष्कार टाकला आहे. असे देखील संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) का उभारलं आहे? आत्ताचे वापरातील जे संसद भवन आहे, ते अजुन १०० वर्षे टिकेल. तरीदेखील नवी संसद उभारण्यात आली आहे. कारण मोदी सरकारला स्वतःच्या नावाने पाट्या लावायच्या आहेत. नवी संसद उभारली पण राष्ट्रपतींना निमंत्रण नाही. राष्ट्रपतींचा तो अधिकारच आहे. त्या तिन्ही दलांच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्म (Droupadi Murmu) हे एकाच कार्यक्रमाला जाऊ शकतात. मात्र त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेलं नाही.
नवीन इमारत बांधून काय साध्य केलं? द्रौपदी मुर्म यांना उद्घाटनाला न बोलवण हा राजकीय शिष्टाचार झालेला आहे. परंतु या नवीन भवनाचे उद्घाटन पंतप्रधान करत आहेत. काँग्रेस सह सगळ्या पक्षातील नेते या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं असं मोदी आणि भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत होते. नव्या संसदेच्या उद्घाटनाचा त्यांना सन्मान का दिला जात नाही. ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे .
Break Up | ब्रेकअप मधून बाहेर पडण्यासाठी वापरा ‘या’ पाच सोप्प्या टिप्स !.